इंडिगोची सेवा कोलमडली आहे. अनेक विमानतळावर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. इंडिगोची बुकिंग सिस्टिम फेल झाली आहे. तिकीट बुकिंगची गती मंदावली असल्याने विमान उड्डाणावर परिणाम झाला आहे. कंपनी ही समस्या त्वरीत सोडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. पण तोपर्यंत विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. थोड्यावेळापूर्वी कर्मचाऱ्यांनी पण जादा कामाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. त्यातील काहींनी विमान उड्डाणाला नकार दिला होता. त्यानंतर आता ही समस्या समोर आली आहे.
कंपनीने स्वतः या अडचणीची माहिती ट्विट करुन समाज माध्यमावर दिली आहे. त्यानुसार, जवळपास 12.30 वाजता कंपनीच्या बुकिंग प्रणालीत तांत्रिक अडचण आली. तेव्हापासून ही समस्या सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील फ्लाईट ऑपरेशन्स आणि ग्राउंड सर्व्हिसेजवर मोठा परिणाम दिसून येत आहे. इंडिगोने थोड्या वेळापूर्वी या समस्यने त्यांच्या प्रणालीने दम तोडल्याचे आणि सेवा मंदावल्याचे कंपनीने जाहीर केले. त्याचा साईट आणि बुकिंग स्टिस्टिम प्रभावित झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना बुकिंग आणि दुसऱ्या शहरात जाण्यासाठी वेळ लागत आहे. चेक इन प्रक्रियेला उशीर होत असल्याने विमानतळावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
लवकरच समस्या सूटणार
दरम्यान कंपनीने ग्राहकांना ही समस्या लवकरच सुटणार असल्याचे आश्वासन दिले आहे. विमान प्राधिकरणाच्या सहकार्याने लवकरच अडचण दूर होण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कंपनीने ट्विट करुन या गैरसोयीबद्दल प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीने केलेल्या या खोळंब्यामुळे अनेकांची पुढील कामे थांबली आहेत. काहींना दुसऱ्या ठिकाणी अजून प्रवास करायचा होता. त्यांना फ्लाईट बदलून जायचे होते. पण त्या सर्वांसमोर आता अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. अनेक यात्रेकरू अजूनही विमानातच बसून आहे. त्यातील काही तर गेल्या तासाभरापासून विमान उड्डाणाची वाट पाहत आहेत. पण कंपनीने त्यांना कोणतीही सूचना दिली नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. इंडिगोची ही नेहमीचीच बोंब असल्याचा सूर काही प्रवाशांनी आळवला आहे. त्यांनी कंपनीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.