Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगलेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती, शिंदे गटाचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, सचिव वरुण सरदेसाई, उपनेते कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा कारटं असा उल्लेख केला होता. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा. हिऱ्यापोटी गारगोटी नेहमी म्हणतो तेच उदाहरण असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही. आम्ही कामामधूनच उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याने ती बिथरले आहेत, म्हणून असं बोलत असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला.

 

देशाच्या पंतप्रधानाने यायला लागले

दरम्यान, उद्धव ठाकरे पक्षप्रवेश झाल्यानंतर बोलताना म्हणाले की कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथं भगव्याला गद्दारीचा डाग लागला तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रूपाने भगव्याचे तेज प्रज्वलित करा. कल्याण डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा असे आवाहन केले. त्यांनी पुढे सांगितले की मी बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलो. या सगळ्या भ्रमाला अनेक जण बोलले आणि त्यांच्या पालक्या वाहिल्या. तुमच्या डोळ्यावर झापड बांधली गेली होती आणि आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगले झाले. तुम्ही त्याच्या आहारी गेला होता ते हिंदुत्व ते विचार बाळासाहेबांचे नाहीत हे तुमच्याही लक्षात आलं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. एका बाजूला प्रचंड ताकत सत्ता पैसा झेंडूच्या या सगळ्या गोष्टी असतानाही शिवसेनाप्रमी मतदारांनी आपल्या सामान्य कार्यकर्तीला चार लाख मतं दिली. शिवसेनेच्या साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाने यायला लागले, तरी देखील कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मतं भगव्याला दिली. त्या मतदारांचा अभिमान असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -