Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंगखुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी...

खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी अशीच एक योजना राबवण्यात आली आहे. लखपती दीदी योजना ही खास महिलांसाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज मिळत आहे.

 

महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामदेखील राबवला जातो. जेणेकरुन त्यांना व्यवसायासंबंधित अनेक गोष्टींची माहिती मिळेल.

 

या योजनेत स्किल ट्रेनिंग देऊन महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विविध क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून हे ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यापासून ते त्याचे मार्केटिंग कसे करायचे इथपर्यंत सर्व गोष्टींबाबत मदत केली जाणार आहे.

 

महिलांना रोजगारनिर्मितीसोबतच बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. १८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिला ही भारतातील राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे. याचसोबत कोणत्याही बचतगटात सहभागी असणे गरजेचे आहे.

योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांनी आपल्या बचत गट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लानबाबत माहिती द्यायची आहे. हा अर्ज मान्या झाल्यानंतर तुम्हाला संपर्क केला जाईल. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ, बँक पासबुक याचसोबत अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो द्यावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -