Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रपीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नियमात झाले 'हे' नवीन बदल; जाणून...

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या नियमात झाले ‘हे’ नवीन बदल; जाणून घ्या सविस्तर!.

पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेचा (Farmers Scheme) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

 

केंद्र सरकारने पीएम किसान (PM Kisan) आणि नमो सन्मान (Namo Shetkari Yojana) या योजनेत काही महत्वपूर्ण बदल (New Changes) केले आहेत. अधिकाधिक आणि योग्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. या बदलामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers) काही नवीन नियम पाळावे लागणार आहेत. चला तर मग केंद्र सरकारने या योजनेत (Farmers Scheme) काय बदल केले आहेत ते जाणून घेऊ या.

 

हे आहेत नवीन नियम(Farmers Scheme)

 

नवीन बदलानुसार 2019 नंतर जमीन खरेदी (Land Purchase) केलेल्या शेतकर्‍याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ, 2019 पूर्वी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड (Aadhar Card) जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

जर कुटुंबातील कोणाचे निधन झाले असेल आणि वारसा हक्काने जमीन मिळाली असेल, तर फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असलेल्या किंवा कर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या कारणामुळे नियमात बदल करण्यात आले

 

या बदलामागे सरकारचे उद्दिष्ट योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवणे हे आहे. अनेकदा असे दिसून आले होते की, पात्र नसलेल्या व्यक्ती या योजनेचा (Farmers Scheme) लाभ घेत आहेत. त्यामुळेच सरकारने ही नवीन नियमावली लागू केली आहे.

 

नवीन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

 

लाभार्थी शेतकर्‍याच्या नावाचा नवीन सातबारा

अर्ज केलेल्या शेतकर्‍याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा असेल, तर एकच फेरफार

फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाला असेल, तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार

पती, पत्नी व मुलांचे आधार कार्ड

12 अंकी रेशन कार्ड

या योजनेचे महत्त्व काय आहे?

 

पीएम किसान आणि नमो सन्मान या योजना (Farmers Scheme) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतीच्या कामांसाठी आवश्यक खर्च करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -