Thursday, October 17, 2024
Homeमहाराष्ट्रपेट्रोल डिझेलचे दर कधी कमी होणार ? सरकारने काय दिलं उत्तर ?

पेट्रोल डिझेलचे दर कधी कमी होणार ? सरकारने काय दिलं उत्तर ?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बाजारावर आधारित असतात . पेट्रोलियम कंपन्या त्यासंदर्भात निर्णय घेतात . मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावर पेट्रोलचे दर ठरताना दिसतात.

 

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाने प्रतिबॅरल 78 डॉलरचा टप्पा गाठला आहे. मात्र याचा परिणाम भारतातील पेट्रोलच्या किमतीवर होणार का यावर भारत सरकारने उत्तर दिले आहे.

 

तेलाच्या किमती 70 डॉलर्सवरून 78 डॉलरवर

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात की पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे जगातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारताचे यावर बारकाईने लक्ष आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलर्सवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढ झाली असून, हा संघर्ष असाच वाढत राहिल्यास त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर होणार आहे. पण अजून तेलाच्या पुरवठ्यावर कोणत्याच परिणाम झाला नाही. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आयातदार आहे. या संघर्षाचा परिणाम भारतावर होईल का हा मोठा प्रश्न उपलब्ध झाला आहे. पण यावर पुरी सांगतात की , भारतात तेलाचा तुटवडा नाही आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याचा विश्वास आहे आणि त्याला भारत तोंड देण्यास तयार आहे.

 

तेलाचे प्रमुख केंद्र होर्मुझ

 

इराण आणि इस्रायलच्या संघर्षामुळे इस्रायल इराणमधील तेल किंवा आण्विक प्रकल्प नष्ट केल्यास, याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण जगातील सर्वात महत्त्वाचे तेल वाहतूक केंद्र होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकते. त्यामुळे तेलाच्या किमती वाढतील की कमी होतील यावर सगळ्यांचे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रेटिंग एजन्सी ICRA ने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन-तीन रुपयांनी कमी होतील असेल सांगितले होते .

 

तेल निर्यातीवर परिणाम होणार नाही

 

सर्व प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी सौदी अरेबिया, इराक, कुवेत, आणि संयुक्त अरब अमिराती हे देश तेलाची निर्यात करतात. या देशातून तेलाची निर्यात होर्मुझ सामुद्रधुनीच्या साह्याने होते होते. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांमध्ये तेल वाहतुकीसाठी पाइपलाइनची व्यवस्था आहे. ही पाइपलाइन होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून नसल्यामुळे, या सामुद्रधुनीवर जर काही तणाव किंवा अडचणी उद्भवल्या तरी, त्यांच्या तेल निर्यातीवर परिणाम होत नाही. होर्मुझ सामुद्रधुनी हे एक महत्त्वाचे व्यापारी जलमार्ग आहे, ज्याद्वारे अनेक देश आपले तेल निर्यात करतात. पण पाइपलाइनमुळे सौदी अरेबिया आणि UAE या मार्गाशिवायही तेलाची निर्यात करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -