Monday, April 22, 2024
Homeसांगलीखुनी थरार! रक्ताने माखलेली कुर्‍हाड घेऊन 'तो' चौकातच थांबला होता

खुनी थरार! रक्ताने माखलेली कुर्‍हाड घेऊन ‘तो’ चौकातच थांबला होता

अनैतिक संबंधाच्या संशयावरून रणजित रमेश पाटील (वय 31) याचा भरदिवसा कुर्‍हाड व कोयत्याने मानेवर वार करून निर्घृण खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील येलूर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी बाप-लेकांना कुरळप पोलिसांनी घटनेनंतर लगेच जेरबंद केले. आनंदराव सावळा पाटील (वय 77), अमोल आनंदराव पाटील (27, दोघे रा. येलूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रणजित पाटील याचे आपल्या सुनेशी अनैतिक संबंध असल्याचा
संशय आनंदराव पाटील व त्यांचा मुलगा अमोल पाटील यांना आला होता. त्यावरून काही दिवसांपूर्वी वादावादीही झाली होती. मात्र पोलिसांनी व स्थानिक लोकांनी रणजितला समज दिली होती.
दरम्यान, सोमवारी रणजित हा दुपारी येथील वारणा बाजारच्या समोर आल्यावर संशयित आनंदराव व अमोल या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने व कुर्‍हाडीने मानेवर जोरदार वार केला. यामध्ये रणजित हा जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या रणजितला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयित आनंदराव रक्ताने माखलेली कुर्‍हाड घेऊनच चौकात थांबला होता. खुनाची माहिती वार्‍यासारखी पसरली. चौकात लोकांची एकच गर्दी झाली होती. तपास पोलिस बाजीराव भोसले करत आहेत. रणजित याचा चुलत भाऊ प्रविण शंकर पाटील यांनी कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -