Thursday, October 3, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात पावसाने मोडले ५९ वर्षांचे रेकॉर्ड!

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने मोडले ५९ वर्षांचे रेकॉर्ड!

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे कोल्हापूरकरांना गुलाबी थंडीऐवजी सरीसरीवरचा अनुभव आला. 1962 नंतर प्रथमच डिसेंबर महिन्यात म्हणजे हिवाळ्यात 1 डिसेंबर 2021 रोजी 24 तासांत 69 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात हिवाळ्यात कोसळण्याचा पावसाने 59 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

कोल्हापूर जिल्ह्यात 59 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर 1962 रोजी 24 तासांत सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामान विभागाकडे आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, त्यावेळी कोल्हापुरात 24 तासांमध्ये 051.7 मि.मी. पाऊस झाला होता. तर संपूर्ण डिसेंबर महिन्यात 109.2 मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, यंदाच्या पावसाने हे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यंदा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला होता. बुधवारी (दि. 1) 24 तासांमध्ये तब्बल 69 मि.मी. पाऊस झाला होता. शुक्रवारी 24 तासांमध्ये 3 मि.मी. पाऊस झाला.

गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहता डिसेंबर महिन्यात तुरळक पावसाची नोंद पाहायला मिळते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांत कोल्हापूरमध्ये केवळ वर्ष 2019, 2017, 2014 आणि 2010 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पाऊस पडल्याची नोंद आहे. या चारही वर्षांमध्ये झालेला पाऊस 1 मि.मी. पेक्षा कमी होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र, पुन्हा थंडीचे जिल्ह्यासह राज्यभर पुनरागमन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -