Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रऑनलाईन विक्री पडली महागात; महिलेच्या खात्यातून उडाले तब्बल ९ लाख ७५ हजार

ऑनलाईन विक्री पडली महागात; महिलेच्या खात्यातून उडाले तब्बल ९ लाख ७५ हजार

हडपसर येथील काळेपडळ येथे वास्तव्यास असणाऱ्या 38 वर्षीय महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. जूनमध्ये ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्मवर महिलेने घरातील मंदिर विकण्याचा प्रयत्न केला. यासाठी सर्वप्रथम महिलेने एका ऑनलाईन पोर्टलवर मंदिर चार हजार रुपयांना विकण्याची जाहिरात पोस्ट केली.

 

सायबर गुन्हेगाराने महिलेला हेरले आणि ऑनलाईन फसवणूकीत महिलेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. महिलेने ऑनलाईन फसवणुकीत तब्बल ९ लाख ७५ हजार रुपये गमावले. या ऑनलाईन फसवणुकीला सुरुवात झाली जेव्हा महिलेने घरातील मंदिर विकण्याची जाहिरात पोस्ट केली. गुन्हेगाराने खरेदीदार बनत महिलेशी संपर्क साधला. सुरुवातीला गुन्हेगाराने तिच्या बँक खात्यात २ रुपये ट्रान्सफर केले. पुढे गुन्हेगाराने पुढील पैशांचा व्यवहार सुरु राहावा यासाठी महिलेला त्याने ५ हजार रुपये गुन्हेगाराच्या खात्यावर ट्रांन्सफर करण्याची विनंती केली.

 

हडपसर पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) नीलेश जगदाळे यांनी सांगितले की, गुन्हेगाराने विविध बाबी घुमवून फिरवून सांगत महिलेची फसवणूक केली. मंदिराच्या देयकासह पैसे परत करण्याचे आश्वासन महिलेला दिले.यानंतर महिलेला एक व्हिडिओ पाठवून काही सूचनांचे पालन करण्यास सांगितले, आपली फसवणूक होत आहे महिलेच्या लक्षात आले नाही. महिलेने एकूण ९ लाख ७५ हजार रुपये गुन्हेगाराच्या खात्यावर पाठवले होते.गुन्हेगारानी महिलेला गोड बोलून खोटे आश्वासन दिले होते. ” अशी माहिती जगदाळे यांनी दिली

 

सुरुवातीला पीडितेने केंद्र सरकारच्या सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार शहर सायबर क्राईम पोलिसांकडे पाठवण्यात आली, सायबर क्राईम पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी केली आहे. तक्रारीच्या तपशीलाची पडताळणी केल्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे पाठवले. त्यानंतर फसवणुकीची रीतसर तक्रार नोंदवण्यात आली.

अशा घटना ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित वाढता धोका आणि अज्ञात व्यक्तींसोबत व्यवहार करताना घेण्यात येणाऱ्या सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करते. संबंधित सायबर गुन्हेगारांचा शोध काढण्यासाठी अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -