Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींनंतर आता लवकरच भावांनाही मिळणार पहिला हप्ता

लाडक्या बहिणींनंतर आता लवकरच भावांनाही मिळणार पहिला हप्ता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची जोरदरा चर्चा सुरू आहे. यानंतर आता लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतनाचा पहिला हप्ता दिला आहे.

 

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

मंगलप्रभात लोढा यांनी आज, बुधवारी (09 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत राज्यातील 46 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात विद्यावेतनाचा पहिला हप्ता जमा होणार असल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मिळणारे विद्यावेतन विद्यार्त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डीबीटीमार्फत 46 हजार विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे.

या उपक्रमात 10 हजार 586 अस्थापनांनी आणि 3 लाख 69 हजार 798 प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यातील 1 लाख 79 हजार 318 प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये 87 हजार 149 प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत. त्यामुळे आता एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या खात्यात प्रत्येकी 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन जमा केले जाणार आहे, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

 

राज्यात 417 आयटीआयमध्ये 146 आयटीआयचे नामांतर केले आहे. उरलेल्या आयटीआयसाठी काय नाव द्यायचे, हे लोकांनी सांगावे, असे आवाहन लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या. पार्श्वभूमीवर सोमवारपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी सर्व फाईल्स निकाली काढण्याचा आमचा मानस आहे. लोकांनीही त्यांचे काही प्रश्न असतील, तर ते तत्काळ मांडावेत. जेणेकरून लोकांचे प्रश्न मार्गी लावत झिरो पेंडन्सी फाईल ठेवण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न आहे, असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

 

दरम्यान, मंगळवारी (08 ऑक्टोबर) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा सोलापुरात पार पडला. यावेळी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. त्यामुळे हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -