Tuesday, October 15, 2024
Homeतंत्रज्ञानपाहिला का ? रंग बदलणारा सरडा नाही ‘स्मार्ट फोन’ ; Tecno Camon...

पाहिला का ? रंग बदलणारा सरडा नाही ‘स्मार्ट फोन’ ; Tecno Camon 30S लाँच

टेक्नो आपल्या Camon सिरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे . या कंपनीने ग्लोबल मार्केटसाठी Tecno Camon 30S आणला आहे. या फोनमध्ये रंग बदल्याचे वैशिष्ट्य आहे. उन्हामध्ये गेल्यावर फोनचा रंग गडद निळा दिसतो, ज्यामुळे याला एक वेगळा अंदाज येतो . याशिवाय या फोनची बॅटरी अतिशय दमदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांचे आकर्षण वाढणार आहे. चला तर रंग बदलणाऱ्या फोनची खासियत जाणून घेऊयात

 

Tecno Camo 30S फोनची वैशिष्ट्ये

फोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले 120 हर्टजच्या रिफ्रेश रेट सपोर्टसोबत उपलब्ध आहे. तसेच त्यामध्ये 1300 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्लेवर गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन दिलेले आहे. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Helio G100 चिपसेट असून , ज्याला 256 जीबी पर्यंत स्टोरेज जोडलेले आहे. या फोनला 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W च्या चार्जरने चार्ज होणार आहे. या फोनची अजून एक खासियत अशी कि , 50MP + 2MP कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 13MP चा सेंसर दिला आहे. यामुळे ग्राहक त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील . हा फोन 6GB+128GB आणि 8GB+256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. यात 8GB वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील आहे.

 

चार रंगात उपलब्ध

या फोनची खास गोष्ट म्हणजे यात रंग बदलणारा बॅक पॅनल आहे. जर तुम्ही हा फोन सूर्याच्या प्रकाशात घेऊन गेला तर प्रकाश पडल्यामुळे फोन गडद निळा दिसू लागतो. Tecno Camon 30S सध्या पाकिस्तानमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना तो चार रंगामध्ये उपलब्ध होणार असून , तो निळा ,गडद जांभळा , काळ्या , सोनेरी या रंगामध्ये मिळणार आहे.

 

 

किंमत

फोनचे अजून एक दमदार वैशिष्ट्य असे आहे कि तो फोन धुळीपासून आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP53 रेटिंग मिळणार आहे. यामध्ये डॉल्बी एटमॉस असलेले स्टीरियो स्पीकर आणि सुरक्षा म्हणून फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. याची किंमत पाकिस्तानमध्ये PKR 59999 म्हणजेच सुमारे 18000 रुपये आहे. भारतात सुद्धा हा फोन याच किमतीच्या आसपास उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -