Wednesday, October 16, 2024
Homeतंत्रज्ञानसणासुदीच्या काळात Jioचे ग्राहकांना गिफ्ट ! 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत स्विगी आणि अमेझॉन...

सणासुदीच्या काळात Jioचे ग्राहकांना गिफ्ट ! 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत स्विगी आणि अमेझॉन प्राईम मेंबरशिप

रिलायंस जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नव नवीन ऑफर्स घेऊन येतात . सणासुदीच्या काळात त्यांनी नवीन प्रीपेड प्लान लॉन्च करून ग्राहकांना एक भेट दिली आहे. हा प्लॅन ग्राहकांच्या खर्चाचा विचार करून तयार केला असून, यामध्ये कमी खर्चात जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यांच्या या प्लॅनमध्ये 1028 रु आणि 1029 रुपयात कॉलिंग आणि डेटा सोबत अनेक सुविधाही मिळणार आहेत. हा प्लॅन ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

84 दिवसांची व्हॅलिडीटीमध्ये स्विगी वन लाइट मेंबरशिप

1028 रुपयेच्या प्रीपेड प्लानमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे . यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 168 GB डेटा असणार आहे. या प्लानमध्ये प्रत्येक दिवशी वापरकर्त्यांना 2 GB डेटा उपलब्ध होणार आहे . जर तुम्ही 5G नेटवर्क असलेल्या ठिकाणी राहात असाल तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल . रोजचा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 5G इंटरनेट उपलब्ध होईल. यासोबत स्विगी वन लाइट मेंबरशिप मोफत मिळणार आहे . यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडही मिळणार आहे.

 

Amazon Prime ची मोफत मेंबरशिप

1029 रुपयेचा रिचार्ज प्लॅन 1028 रुपयेच्या प्लानप्रमाणेच सेवा देत आहे . या प्लानमध्ये ग्राहकांना Amazon Prime Lite ची मोफत मेंबरशिप मिळते. याशिवाय, 1028 रुपये प्लानप्रमाणेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. जर तुम्ही जास्त ऑर्डर वगैरे करत असाल, तर तुम्हाला 1028 रुपये प्लानचा विचार करावा लागेल, कारण त्यात स्विगी वन लाइट मेंबरशिप मोफत मिळते. पण जर तुम्हाला चित्रपट किंवा वेब सिरीज बघायला आवडत असेल, तर तुम्ही जिओच्या 1029 रुपये रिचार्ज केला पाहिजे. हे दोन्ही प्लॅन कमी खर्चात चांगल्या ऑफर्स देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -