विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या पक्षांमध्ये गडबड चालू झालेली आहे. पक्ष वाटपाचे काम देखील चालू झालेले आहे. आणि अशातच विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू शकते. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवारी ही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गेल्या दोन आठवड्यांपासून कॅबिनेट बैठका घेतलेल्या आहे.
नुकतेच आज म्हणजे सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार बांधकाराविषयी मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आता इमारत कामगारांना 5 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. परंतु या योजनेची सविस्तर माहिती अजूनही सरकारकडून आलेली नाही. आता या कॅबिनेट बैठकीमध्ये नक्की कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गावरील टोल हालक्या वाहनांसाठी माफ करण्यात आलेले आहे. आज रात्रीपासूनही अंमलबजावणी होणार आहे.
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम उपलब्ध होणार.
दमनगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता दिली.
आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता दिली.
वैजापूरच्या शनि देवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता दिली.
राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित होणार.
पुणे मेट्रो रेल टप्पा 2 मधील सर्व मार्गिकांच्या कामांना मान्यता दिली.
किल्लारीच्या शेतकरी सहकार कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ करण्यात येणार.
अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ होणार.
मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसंचे तीन पदे भरली जाणार.
मराठी भाषा विषयक जनजागृती पंधरावडा राबविण्यात येणार.
अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यास गट तयार करण्यात येणार.
कौशल्य विद्यापीठात रतन टाटा यांचेनाव दिले जाणार.