Wednesday, October 16, 2024
Homeराजकीय घडामोडीकोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; महायुतीची पहिली यादी आज जाहीर होण्याची...

कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; महायुतीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतं बिगुल वाजणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते. अशातच सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागलेत. जागावाटपांसाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. अशातच आता महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2. 30 मिनिटांनी महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. आज दुपारच्या पत्रकार परिषदेत महायुतीकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

100 जागांवर भाजपची नावं निश्चित

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अमित शाहांसोबत चर्चा केल्यानंतर संपूर्ण जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या 100 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर काही जागांवर महायुतीत अदलाबदल होऊ शकते.

 

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महायुतीने नावं पाठवली

राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत महायुतीने नावं पाठवल्याची माहिती आहे. 12 पैकी 7 जागांसाठी महायुतीने नावं राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आहे. भाजपचे 3, शिवसेना शिंदे गट 2 तर अजित पवार गटाकडून 2 नावं पाठवल्याची माहिती आहे. आज राज्यपाल याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आजच या आमदारांचा शपथविधीदेखील होण्याची शक्यता आहे.

महायुतीने कुणाची नावं पाठवली

भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील यांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. तर धर्मगुरु बाबुसिंग राठोड यांचंही नाव भाजपने राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आहे. शिवसेन शिंदे गटाकडून मनिषा कायंदे, हेमंत पाटील यांचं नाव सुचवलं आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रीस नाईकवडी यांची नावं राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यपाल या नावांना कधी मंजुरी देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -