सोशल मीडियावर कपलचे, लग्नाचे, पती-पत्नीचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका कपलच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. नुकतंच लग्न झालेल्या कपलचा हा व्हिडीओ. या कपलने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
कपल आपले लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण काही कपल प्रसिद्धीसाठी काहीही करतात. फक्त लग्नच नव्हे तर लग्नानंतरचे बेडरूममधील आपले व्हिडीओही ते शेअर करतात. हेच या कपलनं केलं आहे. लग्नानंतरची पहिली रात्र म्हणजे कपलचे खासगी क्षण.
बेडरूममधील आपल्या या खासगी क्षणाचा व्हिडीओ कपलने बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. कपलने बेडरूममध्ये ते काय काय करत होते हे सगळं दाखवलं. एक्सपेक्टेशन VS रिअॅलिटी असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.अरे हनीमूनसाठी काहीतरी ठेवा! Pre wedding मध्येच कपल आऊट ऑफ कंट्रोल; Video Viral व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला नवरी आपला शृंगार उतरवताना दिसते आहे.
ती आपले दागिने वगैरे काढत आहे. इतक्यात नवरदेव येतो आणि तो नवरीच्या गालावर किस करतो. त्यानंतर तोसुद्धा तिला तिचे दागिने काढण्यात मदत करतो. त्यानंतर दोघंही एकमेकांना किस करतात.
नंतर नवरा तिचे केस मोकळे करू लागतो. त्यानंतर पुन्हा तो तिला किस करतो. असं शृंगार उतरवता उतरवता दोघांचाही रोमान्स शेवटपर्यंत सुरू असतो. त्यांनी हे सगळं काही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि सोशल मीडियावरही पोस्ट केलं.
हा व्हिडीओ अनेक युझर्सनी पाहिला आहे. बहुतेक युझर्स व्हिडीओ पाहून संतापले आहेत. सोशल मीडियावर अश्लीलतेचा प्रचार केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
View this post on Instagram