Sunday, November 3, 2024
Homeमनोरंजनधर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिली पत्नी म्हणाली, “मी फार सुंदर नाही अन्..”

धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिली पत्नी म्हणाली, “मी फार सुंदर नाही अन्..”

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची 1970 मध्ये ‘तुम हसीं मै जवां’ या चित्रपटाच्या सेटवर ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी पहिली भेट झाली होती. याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या धर्मेंद्र यांनी विवाहित असतानाही 1080 मध्ये दुसरं लग्न केलं. आजही हे दोघं विवाहित आहेत. मात्र धर्मेंद्र हे त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात. तर हेमा मालिनी या वेगळ्या राहतात. एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली होती.

1981 मध्ये ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, “फक्त माझेच पती का, कोणताही पुरुष माझ्या तुलनेत हेमा मालिनी यांनाच प्राधान्य देणार. कोणाची माझ्या पतीला ‘वुमनायजर’ म्हणण्याची हिंमत कशी झाली, जेव्हा अर्धी इंडस्ट्री हेच करतेय. एकच गोष्ट आहे की सर्व अभिनेत्यांचे अफेअर सुरू आहेत आणि ते दुसरं लग्न करतायत. कदाचित ते सर्वांत चांगले पती नसतील, पण ते माझ्याबाबतीत खूप चांगले होते. ते एक चांगले पिता आहेत. त्यांची मुलं त्यांच्यावर खूप प्रेम करतात.”

हेमा मालिनी यांच्याशी धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यानंतर सनी आणि बॉबी देओल दोघंही खूप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऐकून संतापलेल्या सनीने हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचंही म्हटलं जात होतं. या चर्चांवरही प्रकाश कौर यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या पुढे म्हणाल्या, “हे खरं नाही. प्रत्येक बाळाला असं वाटतं की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईलाच खूप प्रेम करावं. याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्या महिलेवर वार करेल, जी त्याच्या वडिलांवर प्रेम करते. मी उच्चशिक्षित नाही आणि सुंदरही नाही. पण माझ्या मुलांच्या नजरेत मी या जगातील सर्वोत्कृष्ट आई आहे. त्याचप्रकारे माझी मुलंसुद्धा या विश्वात माझ्यासाठी सर्वोत्तम आहेत. मला माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे की ते कधीच कोणाला अशा पद्धतीने त्रास देणार नाहीत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -