मुंबई इंडियन्सकडून पुढील आयपीएलसाठी रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं लवकरच निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांना रिटेन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटसकडून अद्याप के एल राहुल संदर्भात अंतिम निर्णय घेतला गेल नसल्याची माहिती आहे. लखनौची कामगिरी देखील 2024 च्या आयपीएलमध्ये समाधानकारक झाली नव्हती.
मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं होतं. मात्र, मुंबईला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला रिटेन केल्यास 120 कोटींपैकी 61 कोटी रुपये खर्च होतील. इशान किशनला ऑक्शनमधून संघात स्थान दिलं जाईल. तर, टीम डेविडसाठी आरटीएमचा पर्याय वापरला जाऊ शकतो अशी माहिती आहे, यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.
राजस्थान रॉयल्स कॅप्टन संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि रियान परागला रिटेन करण्याची शक्यता आहे. तर राजस्थानची जोस बटलरसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे.
लखनौ सुपर जाएंटसचा केएल राहुल बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ते आयुष बदोनी, वेगवान गोलंदाज मोहसीन खान, निकोलस पूरनला रिटेन करण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव या तिघांना रिटेन करण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगला रिटेन केलं जाईल. याशिवाय शशांक सिंग आणि आषुतोष शर्माला देखील रिटेन केलं जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या 2025 मधील हंगामासाठी सर्व संघांना रिटेन करत असलेल्या खेळाडूंची यादी तयार करायची आहे. पुढील महिन्यात मेगा ऑक्शन होणार आहे, त्यापूर्वी रिटेन करत असलेल्या खेळाडूंची यादी जमा करावी लागणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना यादी सोपवावी लागेल. एखाद्या संघाला सहा खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त पाच कॅप्ड खेळाडू रिटेन करता येतील. चार कॅप्ड खेळाडू आणि दोन अनकॅप्ड खेळाडू देखील रिटेन करता येतील.
आयपीएलच्या रिटेन्शनच्या नियमानुसार पहिल्या खेळाडूसाठी फ्रँचायजी 18 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 14 कोटी, तिसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटींपर्यंत खर्च करु शकते. चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी देखील ही मर्यादा 18 आणि 14 कोटी असेल. फ्रँचायजी राईट टू मॅच हा पर्याय देखील वापरू शकते. मात्र, त्यांनी केवळ 5 खेळाडूंना रिटेन केल्यास तो पर्याय वापरता येईल. अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची मर्यादा 4 कोटी रुपयांप
र्यंत असेल.