Thursday, October 17, 2024
Homeराशी-भविष्य20 ऑक्टोबरला होणार मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' राशींचं वाढणार टेन्शन, कोणताही...

20 ऑक्टोबरला होणार मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन; ‘या’ राशींचं वाढणार टेन्शन, कोणताही निर्णय घेताना राहा सावधान

ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रह हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ ग्रह हा साहस, पराक्रम, शक्ती आणि ऊर्जेचा कारक मानला जातो. त्याचबरोब, मंगळ ग्रह युद्धाचा देखील कारक ग्रह आहे. सध्या मंगळ बुध ग्रहाच्या मिथुन राशीत विराजमान आहे. पण, लवकरच मंगळ राशी परिवर्तन करणार आहे.

आपल्याला माहीतच आहे की, मंगळ ग्रह कोणत्याही राशीत 40 ते 45 दिवसांपर्यंत स्थित असतात. त्यानंतर ते राशी परिवर्तन करतात. 20 ऑक्टोबरच्या दिवशी मंगळ शुक्र ग्रहाच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत संक्रमण करणार आहे. आपल्या नीच राशीत प्रवेश केल्याने मंगळ अनेक राशींचं टेन्शन वाढवणार आहे. तसेच, याचा देश-विदेशातही प्रभाव होणार आहे.

 

युद्धजन्य परिस्थिती येणार

मंगळ ग्रह हा युद्धाचा कारक ग्रह आहे. जेव्हा मंगळ शुभ स्थितीत असतात तेव्हा आपल्याला शुभ फळ मिळते. मात्र, नीच राशीत राहून मंगळ शुभ फळ देत नाही.

त्यामुळे ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे त्या देशातील वातावरण अधिक बिघडण्याची शक्तयता आहे.

षडाष्टक योग जुळून येणार

 

मंगळ ग्रह 20 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत असणार आहे. तर, 6 डिसेंबरपर्यंत तो याच राशीत असणार आहे. सध्या मंगळ आणि शनी एकमेकांच्या सहाव्या भावात असल्यामुळे षडाष्टक योग जुळून येणार आहे. त्यामुळे ज्या देशात आधीपासूनच तणाव आहे त्यांची परिस्थिती आणखी तणावपूर्वक होण्याची शक्यता आहे.

 

‘या’ राशींसाठी मंगळ ग्रह शुभ नाही

मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन मेष, वृषभ आणि कर्क राशींच्या लोकांचं टेन्शन वाढवणार आहे. तर, मंगळ आणि शनीच्या दरम्यान जुळून येणारा षडाष्टक योग सिंह, धनु आणि मीन राशींच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -