Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानआता 3 रुपयात 300 दिवसाचा रिचार्ज भन्नाट ऑफर: वाचा 

आता 3 रुपयात 300 दिवसाचा रिचार्ज भन्नाट ऑफर: वाचा 

वाढत्या रिचार्ज प्लॅनमुळे अनेक लोक चिंतेत आहेत . त्यातच सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ग्राहकांसाठी नुकताच 300 दिवसांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हि योजना ग्राहकांसाठी परवडणारी असून , तुम्हाला केवळ 3 रुपये प्रतिदिन इतक्या कमी दरात सेवा मिळतील. या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जाणार आहे. या प्लॅनची खासियत अशी कि , ग्राहकांचे सीम सुमारे 10 महिने म्हणजेच 300 दिवस सुरु राहील .

797 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन

बीएसएनच्या या 797 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना कमी खर्चात दररोज अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा , मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि 100 एसएमएससारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत कार्डचा बॅलन्स 60 दिवस राहील . त्यानंतर तुम्ही कोणालाही कॉल करू शकणार नाही . पण याची खास गोष्ट अशी कि, तुमच्या फोनची इनकमिंग सेवा सुरु राहील . मात्र आउटगोइंग कॉल, डेटा आणि एसएमएससाठी तुम्हाला पुन्हा रिचार्ज करावा लागेल.

 

ग्राहकांच्या वाढत्या खर्चाची बचत

ही योजना खासकरून दुसऱ्या क्रमांकाच्या BSNL सिम वापरणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांत तुम्ही या योजनेतील कॉलिंग आणि डेटाची पूर्णपणे वापर करू शकता. त्यानंतर, राहिलेले शिल्लक 240 दिवसांत तुम्ही येणारे कॉल रिसीव्ह करू शकता, त्यासाठी पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. बीएसएनएलची ही योजना बजेटमध्ये मिळत असून , ग्राहकांच्या वाढत्या खर्चाची बचत होईल. विशेष म्हणजे ज्यांना त्यांचे सीम खूप कालावधीसाठी चालू ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त ठरूशकतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -