Tuesday, October 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : आय जी एम रुग्णालयाच्या अधिक्षकपदी डॉ. भाग्यरेखा पाटील 

इचलकरंजी : आय जी एम रुग्णालयाच्या अधिक्षकपदी डॉ. भाग्यरेखा पाटील 

येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या अधिक्षकपदी डॉ. भाग्यरेखा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांनी आपला पदभार स्विकारला.

 

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकुमार बनगे यांनी डॉ. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. पाटील या स्त्रीरोग तज्ञ असून पूर्वी त्यांच्याकडे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचा पदभार होता.

 

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रभारी अधिक्षक पदाचा कार्यभार डॉ. नंदकुमार बनगे यांच्याकडे होता. त्यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यामुळे येथील रिक्त पदावर डॉ. भाग्यरेखा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

रुग्णालयात वाढत्या रुग्णांना वेळीच व योग्य उपचार देण्यास प्राधान्य राहील, असे डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या सहा संचालक डॉ. निलीमा सोनावणे, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, रुग्णालयाच्या अधिसेविका चारुशिल्पा बेमल, सहा अधिसेविका सीमा कदम आदींसह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -