Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD ने दिला इशारा

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD ने दिला इशारा

हवामान विभाग देखील पावसाबद्दल सतत अंदाज व्यक्त करत आहे. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे असणार आहे? याबद्दलची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये देखील आज ढगाळ वातावरण असणार आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि परिसरात देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर इथून पुढे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज 26 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

यासोबतच मराठवाड्यात देखील आज पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने शेतकऱ्यांना देखील आपले धान्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा इशारा दिलेला आहे. सध्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. त्याचप्रमाणे भात काढणीस आलेले आहे. परंतु पावसामुळे ही हात काढणी लांबली आहे. त्याचा फटका देखील भाताच्या पिकाला बसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -