महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणूक काळात एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नवं पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ असं अनिल देशमुख यांच्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचं कव्हर पेज समोर आलं आहे. या पुस्तकातील काही पानं टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत. या पुस्तकातून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अनिक देशमुख यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात त्यांचं राजकीय करिअर आणि विशेषत: महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री असतानाचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. या पुस्तकात अनिल देशमुख यांनी ईडीवर गंभीर आरोप लावलेत. देशमुख यांनी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडीविरुद्ध गंभीर आरोप लावले आहेत. ‘ईडी – वरून प्रेशर आहे’ या प्रकरणात अनिल देशमुख यांनी ईडीच्या कामाकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 2021 च्या दिवाळीच्या दिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे
.