Saturday, December 21, 2024
Homeसांगलीशीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची नराधमांनी दिली...

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करण्याची नराधमांनी दिली धमकी

सांगली : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार केला.

त्याचे व्हिडिओ चित्रण केले. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मार्च ते सप्टेंबरदरम्यान पीडित विवाहितेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यात आले. त्यानंतर तिला हुबळी येथे विकण्यासाठी घेऊन जात असताना पीडित महिलेने मिरज (Miraj) येथे संधी साधून कारचा दरवाजा उघडून पलायन करून आपली सुटका करून घेतली.

 

या गुन्ह्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित फजल पटेल (वय ३६, रा. काळे प्लॉट, १०० फुटी रोड, पाकिजा मशीदशेजारी), अल्फात करीम (३५, रा. सांगली), अल्फाज पटेल (रा. काळे प्लॉट) त्या संशितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही परगावची असून, मार्च महिन्यात फजल याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे पीडित महिला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आली त्यावेळी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण करत होता. आपल्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या पीडितेने त्या दोघांना, असे का केले म्हणून जाब विचारला. त्यावेळी संशयित फजल याने आपल्याकडील चाकू काढून पीडितेच्या गळ्याला लावला.

 

हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझ्या मुलाला आणि नवऱ्याला मारून टाकीन, अशी धमकी दिली. जुलै महिन्यात फजल याने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. सप्टेंबर महिन्यात पुन्हा फोन करून पीडित महिलेला सांगलीत बोलावून घेतले. तिला एका लाल रंगाच्या कारमध्ये बसण्यास सांगितले. तिने गाडीत बसण्यास नकार देताच, तिला पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पीडिता गाडीत बसली. ती गाडी संशयित फजल याचा भाऊ अल्फाज हा चालवत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -