Thursday, March 13, 2025
Homeतंत्रज्ञान1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर कोणताच OTP येणार नाही? ग्राहकांसाठी त्रासाचं की फायद्याचं; नेमकं...

1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर कोणताच OTP येणार नाही? ग्राहकांसाठी त्रासाचं की फायद्याचं; नेमकं प्रकरण काय..

सध्या वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार कंपन्या नव्या सुरक्षाविषयक उपाययोजना आणत आहेत. याअंतर्गत OTP आणि इतर महत्त्वाच्या संदेशांच्या ट्रॅसेबिलिटीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.

Jio, Airtel यांसारख्या कंपन्यांनी दूरसंचार नियामक संस्था (TRAI) कडून आलेल्या या नव्या निर्देशांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

 

TRAI च्या नव्या नियमांनुसार, बँका, ई-कॉमर्स आणि वित्तीय संस्थांकडून येणाऱ्या सर्व OTP आणि महत्त्वाच्या संदेशांचे मागोवा घेणे आवश्यक आहे. तसेच, संदिग्ध सेंडिंग चेन असलेल्या संदेशांना ब्लॉक करण्यात येणार आहे, ज्यामुळे OTP सेवा काही काळासाठी अडचणीत येऊ शकते.

वाढत्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी TRAI च्या नव्या नियमनाव्यतिरिक्त, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल प्रतिबंध प्रणाली’ सुरू केली आहे. भारतात आंतरराष्ट्रीय क्रमांक (+091) द्वारे होणाऱ्या फसवणूक कॉल्सला आळा घालण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

सायबर फसवणूक वाढत असताना OTP सेवा बंद होऊ शकते का, यावर अद्याप चर्चा सुरू आहे. OTP सेवा अखंडित राहावी म्हणून बँका आणि दूरसंचार कंपन्यांनी TRAI कडे अतिरिक्त मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना काही काळ OTP सेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -