Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रPM Kisan योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार? लाभ मिळवण्यासाठी करा...

PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार? लाभ मिळवण्यासाठी करा हे काम

सणासुदीच्या काळ सुरु असताना 5 ऑक्टोबर 2024 रोजी, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी करण्यात आला. शेतकरी आता 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

 

19 वा हप्ता या महिन्यात येऊ शकतो

 

पीएम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक वर्षामधून तीन वेळा बँक खात्यात जमा करण्यात येतो. म्हणजेच दर 4 महिन्यांनी हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जातात. ऑक्टोबर महिन्यात 18 वा हप्ता आला आहे आणि त्यानंतर चार महिन्यात 19 वा हप्ता येऊ शकतो म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये येऊ शकतो. परंतु आतापर्यंत सरकारकडून 19 व्या हप्त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे.

 

पीएम किसान योजना

 

पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे.सन 2018 मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेला पीएम किसान योजना ही संबोधले जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले जातात. या योजनेचे वर्षाला तीन हप्ते येतात.

 

पीएम किसान योजना ई-केवायसी आवश्यक आहे

 

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसी केली नाही तर त्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकरी तीन प्रकारे ई-केवायसी करू शकतात.

 

पहिली पद्धत- OTP आधारित eKYC

दुसरी पद्धत बायोमेट्रिक आधारित eKYC

तिसरी पद्धत- फेस ऑथेंटिकेशन आधारित eKYC

 

या तीनपैकी एक पद्धतीचा अवलंब करुन तात्काळ ई-केवायसी करुन घ्या.

 

सरकारकडून पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे या यादीमधील नावे तपासून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार की नाही हे कळू शकते.

 

लाभार्थी यादीतील नाव तपासण्यासाठी हे करा

 

सर्वप्रथम तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर https://pmkisan.gov.in/ जा .

त्यानंतर तेथे beneficiary Status ( लाभार्थी स्थिती) हा पर्याय निवडा.

यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -