Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रशेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स 634 अंकांनी वाढला, निफ्टीही 24,300च्या...

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स 634 अंकांनी वाढला, निफ्टीही 24,300च्या वर

दिवाळीनिमित्त शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा 5 दशकांहून अधिक जुनी आहे. व्यापारी या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करतात आणि या दिवशी आपले काम थांबवत नाहीत, तर आपले काम अधिक भक्तीने करतात.

काही लोक या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात.

 

दिवाळीत हिंदू लेखा वर्ष संवतची सुरुवात होते आणि व्यापारी या दिवशी त्यांच्या लेजरची पूजा करतात. असे मानले जाते की दिवाळीच्या शुभ दिवशी व्यवसाय सुरू केल्यास वर्षभर समृद्धी येते.

 

मुहूर्त ट्रेडिंगच्या प्रीओपनिंग सेशनमध्ये BSE 1,100 पेक्षा जास्त अंकांनी आणि निफ्टी सुमारे 200 अंकांनी वाढला होता. शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग 2024 सुरू झाले आहे. सुरुवातीच्या व्यवहारात, 30 शेअर्सचा सेन्सेक्स 634 अंकांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे, तर निफ्टीने 100 अंकांच्या वाढीसह 24300 चा टप्पा पार केला आहे.

 

Nifty above 24,300

आज महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे जाहीर झाल्यानंतर वाहन शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

 

BSE SENSEX

शेअर बाजाराचे मार्कट कॅप गेल्या ट्रेडिंग सत्रात 444.73 लाख कोटी रुपये होते. त्याच वेळी, संवत 2080 ते संवत 2081 दरम्यान, भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 128 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात, गुंतवणूकदारांनी संवत 2080 मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.

 

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्तावर विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष चौहान यांनी गुंतवणूकदारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की नवीन संवत 2081 हे मागील संवत 2080 पेक्षा अधिक चांगले असावे.

 

गुंतवणूकदारांना पैसा तुमचा आहे आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने गुंतवा, असा सल्ला देताना त्यांनी टिप्स, अफवा, व्हॉट्सॲप मेसेजकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन केले आहे. तसेच, ज्या गुंतवणूकदारांना डेरिव्हेटिव्ह्जचे ज्ञान नाही त्यांनी त्यामध्ये व्यापार न करण्याचा सल्ला दिला आहे.

 

बाजार उघडला तेव्हा निफ्टी-50 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, एनटीपीसी, बीईएल आणि आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या टप्प्यात हे शेअर बाजारात सर्वाधिक तेजीत होते. अदानी ग्रुपच्या शेअर्सचा विचार करता, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली, तर समूहाच्या अदानी पॉवर आणि अदानी एनर्जीच्या शेअर्समध्ये वाढीसह व्यवहार होताना दिसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -