Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातून थंडी झाली गायब; अनेक ठिकाणी पावसाचा ईशारा

राज्यातून थंडी झाली गायब; अनेक ठिकाणी पावसाचा ईशारा

नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, तरी देखील राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण दिसत आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडताना दिसत आहे. वातावरणातून थंडी गायब झालेली आहे. आणि ढगाळ वातावरण सर्वत्र दिसत आहे. हवामान विभाग पावसाबद्दल तसेच थंडी बद्दल रोज अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 3 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाटांसह पाऊस (Weather Update ) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण (Weather Update ) असल्यामुळे थंडी काहीशा प्रमाणात नाहीशी झालेली आहे. तरी पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा थंडी परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. ढगाळ वातावरण कमी झाले की, थंडीचे प्रमाण आपोआप वाढणार आहे. अशी माहिती देखील हवामान विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढलेली आहेत. त्यांची देखील योग्य ठिकाणी साठवणूक करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -