सरकारी मालकीच्या अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. कोल इंडिया लिमिटेड (CIL) या कंपनीचाही यात समावेश आहे. सीआयएल ही अशी एक कंपनी आहे, जी भारतीय नागरिकांना योग्य दरात वीज मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील असते. ही एक महारत्न कंपनी आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना साधारण 50 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.
कंपनीकडे 2.25 लाख कर्मचारी
सीआयएल ही देशातील सर्वांत मोठी कोळसानिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडे सध्या एकूण 2.25 लाख कर्मचारी आहेत. राष्ट्रीयीकरणारच्या अगोदर या कंपनीकडे साधरण 6.75 लाख कर्मचारी होते. कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झालेली असली तरी या कंपनीच्या उत्पादन क्षमतेत मात्र मोठी वाढ झालेली आहे. या कंपनीला आता 50 वर्षे झाले आहेत.
कंपनीने गुंतवणूकदारांना दिले दमदार रिटर्न्स
कोल इंडिया या कंपनीने दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. बीएसईवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार (2 नोव्हेंबरपर्यंत) गेल्या एक आणि दोन आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे मूल्य 1.46 टक्के 7.67 टक्क्यांनी घसरले आहे. एका महिन्याचा विचार करायचा झाल्यास या कंपनीचा शेअर साधारण 10.62 टक्क्यांनी घसरला आहे.
दीर्घकालीन गुंतवणुकीत कंपनीची कामगिरी कशी?
3 महिन्यात या कंपनीचा शेअर 15.90 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र एका वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 48.16 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. दोन वर्षांच्या गुंतवणुकीत शेअर होल्टर्सना 85.02 टक्क्यांनी रिटर्न्स मिळालेले आहेत. तीन वर्षांच्या गुंतवणुकीमागे या कंपनीने आपल्या गुंतवणूकादरांना 166.28 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.