Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंगTata समूहातील मोठी अपडेट; 13 वर्षांनंतर पहिल्यांदा झाला नियमात हा बदल, नोएल...

Tata समूहातील मोठी अपडेट; 13 वर्षांनंतर पहिल्यांदा झाला नियमात हा बदल, नोएल टाटा, एन चंद्रशेखरन यांच्यात चर्चा

टाटा कुटुंबियांनी नियमात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा समूहाच्या टाटा सन्सच्या बोर्डात सहभागी करून घेण्यात आले आहे. टाटा कुटुंबाच्या नियमानुसास, नोएल टाटा, टाटा सन्नच्या बोर्डात, संचालक मंडळात सहभागी होऊ शकत नाही. कारण 2022 मधील रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने याविषयीचा नियम तयार केला होता. त्यानुसार, टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सचे चेअरमन एकच व्यक्ती नसेल. त्यात आता मोठा बदल झाला आहे. नोएल टाटा येताच हा नियम बाजूला करण्यात आला आहे. पहिल्यांदा एकच व्यक्ती टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्समध्ये सहभागी होईल.

 

दोन्ही संचालक मंडळात सहभागी

 

इकोनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, नोएल टाटा यांची टाटा सन्सच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दिवाळीपूर्वी टाटा सन्सची एक व्हर्चुअल बैठक झाली. त्यामध्ये याविषयीचा प्रस्ताव घेण्यात आला. 2011 नंतर पहिल्यांदा टाटा कुटुंबातील एखादा सदस्य टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्ही संचालक मंडळात दिसणार आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची 66% हिस्सेदारी आहे.

 

काय काम करतील नोएल टाटा

 

नोएल टाटा यांची संचालक मंडळावर एंट्री झाल्यानंतर आता टाटा सन्सच्या बोर्डावर टीव्हीएसचे मानद संचालक वेणु श्रीनिवासन आणि संरक्षण मंत्रालायाचे माजी अधिकारी विजय सिंह यांच्यासह टाटा ट्रस्टवर आता तीन नामनिर्देशीत सदस्य झाले आहेत. नोएल टाटा, सिंह, श्रीनिवासन आणि मेहली मिस्त्री सध्या टाटा ट्रस्टच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. टाटा सन्सने या घडामोडींवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

एन चंद्रशेखरन आणि नोएल टाटा यांची भेट

 

सूत्रांच्या माहितीनुसार, नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांची भेट झाली. दोघांमध्ये चर्चा झाली. नोएल टाटा सध्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प, टेंट आणि व्होल्टासचे गैर कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तर टायटन आणि टाटा स्टीलमध्ये उपाध्यक्ष आणि गैर कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

 

सध्या नोएल टाटा 67 वर्षांचे आहेत. टाटा समूहाच्या नियमानुसार, वरिष्ठांना 70 वर्षे झाल्यावर संचालक मंडळाची पदं स्वीकारणे योग्य नाही. पण ट्रस्टी वा अध्यक्षांना वयाचा हा नियम लागू नाही. नोएल टाटा यांना या पदावर राहण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही, कारण ते गैर कार्यकारी संचालक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -