Thursday, November 21, 2024
Homeराजकीय घडामोडीइथलं पाणी अदानींना विकलं जातंय; कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप

इथलं पाणी अदानींना विकलं जातंय; कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. इथलं पाणी अदानींना विकलं जातंय, असा गंभीर आरोप या सभेतून उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यासोबतची आहे. महाराष्ट्र प्रेमी आघाडी सोबत आहे. मी लढायला मैदानात उतरलो आहोत. साथ देणार आहात? लढणार आहात? विजय देणार आहात? (लोकांचा आवाज हो) मग भाषण करण्याची गरज काय कोल्हापुरातून चांगली सुरुवात झाली. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

 

उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदी शाहांवर निशाणा

निवडणुकीत हिंदू मुस्लिम करायचं तोडफोड करायचं. मराठी माणसात फूट पाडायची,. तुम्ही मेला तरी चालेल, तुम्हाला सत्ता मिळाली पाहिजे ही भाजपची नीती आहे. गेल्यावेळी निवडून दिलं, तू तिकडे गेला. लाचार झाला. पण आता राधानगरीकर लाचार नाही. महाराष्ट्र विकणाऱ्यांना मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू. जो अदानी, शाहांना मदत करतो तो महाराष्ट्राचा शत्रू. जो मोदी आणि शाह यांची पालखी वाहतो तो महाराष्ट्राचा विरोधक, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

 

सतेज पाटलांचं कौतुक

एका गोष्टीचं बरं वाटलं. सतेज पाटील सोबत आहेत. सतेज तुमचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिला. एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं कारण इथल्या विजयाची जबाबदारी मी सतेजवरच टाकतोय. शाहू महाराज सोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत. हा जोश पाहिजे. शिवरायांचा महाराष्ट्र हा जोशपूर्णच पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पेरण्याचा प्रयत्न केला

 

मधल्या काळात ग्रहण लागलं. मी तुमची हात जोडून माफी मागतो. ती चूक माझ्याकडून झाली. पण तुम्ही मोठ्या मनाचे. तुम्ही सर्व केलं. आमदार तुम्ही केलं. मी उमेदवारी दिली. तुमच्या पाठीत वार करायला काही लोक उभे आहेत. आणखी काय द्यायचं होतं. आमदार केलं. मान सन्मान प्रेम दिलं सर्व दिल्यानंतर शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -