Thursday, December 26, 2024
Homeक्रीडाभारत-दक्षिण आफ्रिका मॅचच्या वेळेत बदल, किती वाजता सुरुवात होणार?

भारत-दक्षिण आफ्रिका मॅचच्या वेळेत बदल, किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची विजयी सुरुवात केली. भारताने पहिल्या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 61 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. भारताने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. संजू सॅमसन हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने 107 धावांची खेळी केली. संजूचं हे टी 20i कारकीर्दीतील एकूण आणि सलग दुसरं शतक ठरलं. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे दुसर्‍या सामन्याकडे लागून आहे. दुसरा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना केव्हा?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना रविवारी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना कुठे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना गकेबरहा येथे होणार आहे.

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. तर पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली होती.

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

 

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

 

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -