Sunday, December 22, 2024
Homeसांगलीइस्लामपूरजवळ 9 तलवारी जप्त

इस्लामपूरजवळ 9 तलवारी जप्त

इस्लामपूरजवळ पेठनाका येथे तलवारींच्या विक्रीसाठी थांबलेल्या सौरभ ज्ञानदेव कापसे (वय 21, रा. जवळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून नऊ तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कापसे हा पोलिस भरतीसाठी एका अ‍ॅकॅडमीत तयारी करीत आहे. पैसे मिळविण्यासाठी ऑनलाईन तलवारी मागवून तो विक्री करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सांगितले, गावठी पिस्तूल आणि हत्यारे घेऊन फिरणार्‍यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे.पथक इस्लामपूर विभागात गस्तीवर होते. त्यावेळी पेठनाका येथील शिराळा रस्त्यावरील रिक्षा स्टॉपजवळ एकजण हत्यारे घेऊन विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. संशयित कापसे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -