Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रआयकर विभागाला ही माहिती दिली नाही तर दहा लाखांचा दंड? आयकर रिटर्न...

आयकर विभागाला ही माहिती दिली नाही तर दहा लाखांचा दंड? आयकर रिटर्न भरताना ही चूक करु नका

आयकर विभागाकडून आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आयकर रिटर्नमध्ये विदेशातील संपत्तीची माहिती दिली नाही तर दहा लाखांचा दंड करण्यात येणार आहे. काळा पैसा विरोधी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात रविवारी आयकर विभागाने जनजागृती मोहीम सुरु केली. त्यामुळे आयकरदात्यास 2024-25 चे रिटर्न भरताना त्याची माहिती होईल.

 

या संपत्तीची द्यावी लागणार माहिती

आयकर विभागाने ‘कंप्लायन्स कम अवेयरनसे प्रोग्राम’ सुरु केला आहे. त्यासाठी म्हटले आहे की, भारतातील आयकरदात्यांची विदेशी मालमत्ता, बँक खाती, विमा करार किंवा वार्षिक करार, संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक संपत्ती, स्थावर मालमत्ता, कस्टोडिअल खाते, इक्विटी आणि कर्ज हितसंबंध, ट्रस्ट ज्यामध्ये व्यक्ती विश्वस्त किंवा लाभार्थी आहे, सेटलर, स्वाक्षरी प्राधिकरण खाती, विदेशात ठेवलेली पूंजी याची माहिती आयकर रिटर्नमध्ये भरणे सक्तीचे आहे. करदात्यांना त्यांच्या आयटीआरमध्ये अनिवार्यपणे परदेशी मालमत्ता (एफए) किंवा परदेशी स्रोत उत्पन्न (एफएसआय) भरावे लागणार आहे. त्यांचे उत्पन्न करपात्र असेल किंवा नसेल त्यानंतर ही माहिती द्यावी लागणार आहे.

 

या लोकांना पाठवणार संदेश

आयटीआरमध्ये विदेशी मालमत्ता/उत्पन्न जाहीर न केल्यास काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर कायदा, 2015 अंतर्गत 10 लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. आयकर विभागाची प्रशासकीय संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने सांगितले होते की मोहिमेचा एक भाग म्हणून ते निवासी करदात्यांना यासंदर्भातील माहितीचे एसएमएस आणि ईमेल पाठवेल जाणार आहे. ज्यांनी 2024-25 साठी आधीच आयटीआर दाखल केला आहे, त्यांना हे संदेश देण्यात येणार आहे. उशीरा आणि सुधारित आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -