Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

केंद्र सरकारने टोल टॅक्ससंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्ससंदर्भात नवीन नियमावली केली आहे. त्यानुसार 20 किमीपर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना वाहनधारकांना टोल लागणार नाही. त्यासाठी त्यांच्या वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) हवी आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू झाला आहे. जीएनएसएस असणाऱ्या वाहनधारकांनाच ही सुट मिळणार आहे.

 

 

20 किलोमीटरपर्यंत फायदा

रस्ते परिवहन मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणाऱ्या खासगी वाहनधारकांना टोलमधून सुट दिली आहे. महामार्गावर 20 किलोमीटरपर्यंत वाहन चालवणाऱ्यांना ही सूट असणार आहे. त्यासाठी त्यांच्या वाहनांवर जीएनएसएस सुरु असायला हवी. 20 किलोमीटर पेक्षा जास्त टोल रस्त्याचा वापर करणाऱ्यांना त्या अंतराच्या आधारावर टोल लागणार आहे.

 

काय आहे जीएनएस प्रणाली

ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) हे महत्वाचे तंत्रज्ञान आहे. ते Google मॅप्स आणि इतर संचार प्रणालीसारखे मोबाइल नेव्हिगेशन एप्लिकेशनमध्ये काम येते. टोल घेण्यासाठी देशात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी फास्टॅगसोबत ग्वोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली लागू केली. या निर्णयाचा फायदा टोल प्लॉझाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना होणार आहे.

 

GNSS प्रणाली सध्या पायलट प्रोजेक्ट

देशभरात जीएनएसएस प्रणाली लागू करण्यात आली नाही. सध्या ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये ती लागू केली आहे. या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर ही प्रणाली देशभर लागू होणार आहे. केंद्र सरकार आता टोल प्रणालीमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणत आहे. जितके अंतर तुम्ही प्रवास करणार तितकाच टोल आता लागणार आहे. त्यामुळे टोलमध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे टोल प्लॉझावर लांबच्या लांब रांगाही लागणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -