Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकागद ओला झाला की लगेच फाटतो, पण चलनी नोटांचं तसं होत नाही!...

कागद ओला झाला की लगेच फाटतो, पण चलनी नोटांचं तसं होत नाही! कारण…

आपण रोजच्या चलनात वापरत असलेल्या नोटा कागदाच्या असतात असा आपला आजपर्यंतचा समज आहे. या नोटा खरंच कागदापासून तयार केल्या असत्या तर त्या इतक्या वर्षे टिकल्या नसत्या. मग या नोटांसाठी कोणतं मटेरियल वापरलं जातं? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

 

आपण वापरत असलेल्या नोटांमध्ये 100 टक्के कापूस (कॉटन) वापरला जातो. हे आम्ही नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे.

 

कापसाचा वापर करण्याचं कारण असं की नोटा दीर्घकाळ टिकल्या पाहीजेत. इतकंच काय तर कॉटनच्या कागदावर प्रिंट करण्यासाठी विशिष्ट शाई वापरली जाते.

 

नोटांची प्रिंट करताना आरसीबीआय यावर काही सिक्युरिटसची फीचरचा वापरही करते. त्यामुळे या नोटांची हुबेहूब नकल करणं कठीण होतं. त्यामुळे खोट्या आणि खऱ्या नोटांमधील फरक लगेच कळतो.

 

दोन किंवा त्यापेक्षा अधिक नोटांवरील नंबर एकसारखा असू शकतो का? असा प्रश्नही अनेकदा समोर येतो. आरबीआयच्या बेवसाईटनुसार, नोटांवरील नंबर समान असू शकतो, पण त्यावरील इनसेट लेटर किंवा मुद्रण वर्ष किंवा गर्व्हनरची सही मात्र वेगळी असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -