Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसअवघे 1000 रुपये गुंतवा अन् व्हा करोडपती, जाणून घ्या गुंतवणुकीचा 12-30-12 फॉर्म्युला...

अवघे 1000 रुपये गुंतवा अन् व्हा करोडपती, जाणून घ्या गुंतवणुकीचा 12-30-12 फॉर्म्युला आहे तरी काये?

म्युच्यूअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. SIP च्या माध्यमातून तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या सोईनुसार तुम्हाला एसायपी करण्याचा पर्याय मिळतो, त्यामुळेच सध्या एसआयपी हा पर्याय लोकांमध्ये चांगालच प्रसिद्ध होत आहे. एसआयपीत केलेली गुंतवणूक ही शेअर बाजाराशी जोडलेली असते. मात्र तुलनेने एसआयपीत केलेल्या गुंतवणुकीत कमी जोखमी असते. दीर्घकाळासाठी केलेल्या एसआयपीतून तुम्हाला करोडपतीही होता येते. ते नेमके कसे शक्य आहे? हे जाणून घेऊ या..

 

फक्त 1000 रुपयांची एसआयपी करून होता येईल करोडपती

तुम्ही अगदी 500 रुपयांपासून एसआयपी करू शकता. एसआयपीवर चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो. म्हणूनच तुम्ही दीर्घकालीन एसआयपी केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. एसआयपीच्याच मदतीने फक्त 1,000 रुपयांची SIP करून थेट करोडपती होऊ शकता.

 

12-30-12 या फॉर्म्युल्याने व्हा करोडपती

तुम्ही 12-30-12 या फॉर्म्युल्याच्या मदतीने एसआयपीत गुंतवणूक चालू केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. त्याआधी हा फॉर्म्युला नेमका काय आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे. या फॉर्म्युल्यातील 12 या अंकाचा अर्थ आहे. तुम्ही तुमच्या एसआयपीत प्रत्येक वर्षाला 12 टक्क्यांनी वाढ करायची आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी टॉप अप एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या रकमेत 12 टक्क्यांनी वाढ करावी. या फॉर्म्युल्यातील 30 या अंकाचा अर्थ आहे, तुम्ही ही एसआयपी आगामी 30 वर्षांसाठी करायची आहे. तर या फॉर्म्युल्यातील दुसऱ्या 12 अंकाचा अर्थ आहे. SIP वर केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरुया.

 

फॉर्म्युला कसे काम करणार?

वर नमूद केलेल्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची गुंतवणूक करत आहात, असे गृहित धरुया. या गृहितकानुसार तुम्हाला एका वर्षापर्यंत 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एक वर्ष झाल्यानंतर या एसआयपीमध्ये 12 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. या नुसार दुसऱ्या वर्षी तुमच्या एसआयपीमध्य 120 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच दुसऱ्या वर्षी तुम्ही प्रतिमहिना 1120 रुपयांनी एसआयपी कराल. तिसऱ्या वर्षी या रकमेत 12 टक्क्यांनी वाढ होईल. म्हणजेच तिसऱ्या वर्षी तुम्ही वर्षभर 1254 रुपयांची एसआयपी कराल.

 

…असे व्हाल करोडपती

वर उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही 12 टक्क्यांनी टॉप अप एसआयपी केल्यास आणि पुढचे 30 वर्षे ही एसआयपी चालू ठेवल्यास तुम्ही या 30 वर्षात एकूण 28 लाख 95 हजार 992 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर 12 टक्क्यांनी परताव्याच्या हिसोबाने तुम्हाला 83 लाख 45 हजार 611 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 30 वर्षांनी तुम्हाला एकूण 1 कोटी 12 लाख 41 हजार 603 रुपये मिळतील. असा प्रकारे 12-30-12 हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती करू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -