Saturday, December 28, 2024
Homeराजकीय घडामोडीलाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, त्यामुळे सगळे उताणे पडले – अजित पवार

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, त्यामुळे सगळे उताणे पडले – अजित पवार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची एकत्र पत्रकार परिषद झाली. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आणि जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आभार मानले. अजित पवार म्हणाले की, काल अनेकांच्या गाड्या चालवणं सुरु होतं. कालच चित्र पाहिलं तर आम्ही तर कुठे ही नव्हतो. पण महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड यश दिलं. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमच्या योजनांबाबत चेष्टा करण्यात आली. पंरतू नंतर त्यांच्याच जाहीरनाम्यात कोणतेही हिशोब न देता त्या दिसल्या. लोकसभेत इतकं अपयश मिळेल असं वाटलं नव्हतं.’

 

आमच्यावर जबाबादारी वाढली – अजित पवार

‘लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे सगळे उताणे पडले. आता आमच्यावर जबाबादारी वाढली आहे. इतकं मोठं यश महाराष्ट्रात कोणाला मिळालं नव्हतं. आमच्या पाठिंशी केंद्र सरकार आहे. त्यामुळे मोठा आधार आहे. लोकसभेचा निकाल लागला तर तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर आलं पाहिजे. असं नसतं. वेगवेगळ्या रिजनमध्ये महायुतीला यश मिळालं आहे. काही जागा खूप कमी मतांनी गेल्या आहेत.’ असं ही अजित पवार म्हणाले.

 

ऐतिहासिक विजय – मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या योजनेमुळे ऐतिहासिक विजय मतदारांनी दिला. गेल्या 2 वर्षात जे आम्ही काम केलं. जे निर्णय घेतले ते इतिहासातील न भुतो आणि न भविष्यती असे निर्णय होते. महाविकासाआघाडीने सर्व कामे थांबवली होती. पण ती सर्व कामे आम्ही सुरु केली.

 

 

लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अशा योजनांमुळे लोकांना लाभ मिळाला. हे फक्त बोलणार सरकार नाही. कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. आचार संहिता लागण्यापूर्वीच पैसे खात्यात जमा केल होते. हे सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. कॉमन मॅनच्या आयुष्यात बदल घडवण्याचं काम करायचं आहे. लोकांनी भरभरुन आशीर्वाद दिलेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -