आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला. पंतला लखनऊने 27 कोटींमध्ये घेतलं. या मेगा ऑक्शनमध्ये जितची चर्चा पंतची झाली, तितकीच चर्चा ही वैभव सूर्यवंशी याचीही झाली. ज्या मेगा ऑक्शमध्ये दिग्गज अनसोल्ड राहिले, तिथे हा बिहारचा 13 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी सोल्ड झाला. वैभव फक्त सोल्डच झाला नाही, तर त्याला बेस प्राईजच्या तुलनेत घसघशीत रक्कम मिळाली. वैभवची बेस प्राईज ही 30 लाख रुपये होती. मात्र वैभवला 1 कोटी 10 लाख रुपये मिळाले. वैभव यासह आयपीएल इतिहासातील सर्वात युवा कोट्याधीश खेळाडू ठरला. वैभववर लागलेल्या या बोलीमुळे त्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र वैभव नको त्या कारणामुळे वादात सापडला आहे. त्यावरुन वैभवच्या वडिलांवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.
वैभव सूर्यवंशी हा 13 वर्षांचा नाही. वैभवने त्याचं खोट वय सांगितलंय. वैभव हा 13 नाही तर 15 वर्षांचा आहे, असा आरोप केला जात आहे. यामुळे वैभव चर्चेत आला आहे. त्यामुळे वैभवचे वडिल संजीव सूर्यंवंशी यांनी संताप व्यक्त करत या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
संजीव सूर्यवंशी काय म्हणाले?
“वैभव साडे आठ वर्षांचा होता तेव्हा त्याची बीसीसीआकडून बोन टेस्ट करण्यात आली होती. वैभवने अंडर 19 टीम इंडियासाठी डेब्यू केलं आहे.आम्हाला वयाबाबत कोणतीच भीती नाही. वैभव गरज पडल्यास पुन्हा टेस्टसाठी तयार होईल”, अशी प्रतिक्रिया संजीव सूर्यवंशी यांनी पीटीआयला दिली. खेळाडूंचं अचूक वय जाणून घेण्यासाठी बीसीसीआयकडून बोन टेस्ट केली जाते.
वैभवची निवड झाल्यानंतर संजीव सूर्यवंशी काय म्हणाले?
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
वैभव सूर्यवंशी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बिहारचं प्रतिनिधित्व करतो. वैभवने अवघ्या काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध पदार्पण केलं होतं. वैभवने आतापर्यंत 5 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 100 रन्स केल्या आहेत. तसेच 1 विकेटही घेतली आहे. तलेच वैभवने राजस्थानविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून टी20 डेब्यू केलं.