Thursday, December 12, 2024
Homeबिजनेसगुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याचा अंदाज, सेबीच्या एका आदेशानं बड्या कंपनीच्या...

गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याचा अंदाज, सेबीच्या एका आदेशानं बड्या कंपनीच्या आयपीओला ब्रेक

सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडच्या आयपीओसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सेबीनं C2C Advanced Systems Limited च्या आयपीओच्या लिस्टिंगला स्थगिती दिली आहे. सेबीनं जोपर्यंत कंपनी दोन अटींची पूर्तता करत नाही तोपर्यंत आयपीओची लिस्टिंग होऊ शकणार नाही. पहिली अट ही आहे की कंपनीला त्यांच्या संचालक मंडळात एका स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करावी लागेल. तर, दुसरी अट ही आहे की कंपनीला त्यांचा लेखापरिक्षण अहवाल एनसई किंवा सेबीला द्यावा लागेल.

 

द मिंटच्या रिपोर्टनुसार सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडकडून सांगण्यात आलं आहे की सेबीच्या निर्देशानंतर लिस्टिंगवर स्थगिती देण्यात आली आहे. एनडीटीव्ही रिपोर्टुसार कंपनीनं सोमवारी त्यांच्या आर्थिक खात्यांच्या चौकशीसाठी लेखापरिक्षक नेमला आहे.त्याचा अहवाल दोन तीन दिवसांमध्ये येऊ शकतो. सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडच्या आयपीओच्या लिस्टींगची तारीख 29 नोव्हेंबर 2024 होती.

 

गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार?

सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम लावली होती. या कंपनीच्या आयपीओचा जीएमपी जवळपास 100 टक्के होता. त्यामध्ये मोठी घसरण झाली आहे.आयपीओतील एका समभागाची किंमत 226 रुपये होती, जीएमपीनुसार 471 रुपयांपर्यंत गेला होता. जीएमपीनुसार गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला असता मात्र सेबीच्या सूचनेनंतर जीएमपी 50 टक्क्यांनी घसरला आहे. आता जीएमपीएवर एका शेअरची रक्कम 326 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

 

सेबीच्या निर्देशानंतर सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडनं आयपीओमध्ये गुंतवलेली रक्कम परत घेण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आयपीओमधून सबस्क्रिप्शनमधून माघार घ्यायची असल्यास गुंतवणूकदारांना 28 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत मुद आहे.

 

 

सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेडच्या आयपीओतून 99.07 कोटी रुपये उभारले जाणार होते. यामध्ये 43.84 लाख नवे शेअर जारी केले जाणार होते. यासाठी प्रति शेअर रक्कम 214 ते226 रुपये निश्चित करण्यात आली होती. कंपनीनं संस्थात्मक गुंतवणूकारांसाी 35 टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के कोटा निश्चित केला होता.

 

सी2सी अ‍ॅडवान्स्ड लिमिटेड कंपनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादक कंपनी आहे. संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कंपनी काम करते.

 

दरम्यान, एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ उद्या लिस्ट होणार आहे. या आपीओच्या माध्यमातून कंपनीचा 10 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. या आयपीओला देखील गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. एनटीपीसी ग्रीनच्या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार का हे पाहावं लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -