Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रस्वस्तात विमानाने जाता येणार थेट मुंबई, गोव्याला

स्वस्तात विमानाने जाता येणार थेट मुंबई, गोव्याला

सोलापूरकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता सोलापूरहून मुंबई आणि गोव्यासाठी थेट स्वस्तातला विमानप्रवास करण्याची संधी आहे. तसे पाहायला गेल्यास नामवंत कंपन्यांचा तिकीट दर याच ठिकाणांसाठी थोडा अधिक आहे. मात्र फ्लाय 91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे तिकीट दर प्रवाशांना परवडणारे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कामानिमित्त कमी वेळात गोवा किंवा मुंबईला थेट प्रवास करायचा असेल तर ही चांगली संधी आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात ईमेल द्वारे माहिती मागितली होती आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबीलिटी गॅप फंड आणि रिजनल कनेक्टिव्हिटी योजना म्हणजेच आरसीएस अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गावर फक्त जीएसटी लागू होतो त्यामुळे प्रवास परवडणारा होतो.

 

सोलापूर – मुंबई

 

फ्लाय नाईन्टी वन या कंपनीद्वारे सोलापूर ते मुंबई थेट प्रवासासाठी 1488 रुपयांपासून तिकीट सुरू होते विविध स्लॅब मध्ये दर वाढत जातात प्रवाशांच्या मागणीनुसार त्याची उपलब्धता काय आहे यावरून ठरवले जातात. 9584 रुपयांपर्यंत हे दर आहेत अतिरिक्त शुल्क मध्ये 217 रुपये यूजर डेव्हलपमेंट फी म्हणजेच (UDF), 236 विमान सुरक्षा शुल्क (ASF) आणि पाच टक्के जीएसटी यांचा समावेश होतो.

 

 

सोलापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) :

सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त 689 रुपये आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर 8785 रुपयांपर्यंत जातात. अतिरिक्त शुल्कातही UDF, ASF, आणि GST चा समावेश आहे, जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे.

 

मुंबई ते सोलापूर

निघण्याची वेळ : सकाळी 11:55

पोहोचण्याची वेळ: दुपारी 1:45

 

सोलापूर ते मुंबई

निघण्याची वेळ: सकाळी 9:40

पोहोचण्याची वेळ: सकाळी 11:20

 

गोवा ते सोलापूर

निघण्याची वेळ: सकाळी 8:00

पोहोचण्याची वेळ: सकाळी 9:10

 

सोलापूर ते गोवा

निघण्याची वेळ: दुपारी 2:15

पोहोचण्याची वेळ: दुपारी 3:30

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -