Thursday, November 28, 2024
Homeब्रेकिंगमोठी बातमी! भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके

मोठी बातमी! भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे. सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती मिळत आहे. जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे. याबाबत हैदराबाद येथे रिपोर्ट पाठवून माहिती घेणार, असं तहसीलदरांनी सांगितलं आहे. संबंधित गावात महसूल प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

 

विशेष म्हणजे फक्त भिवंडीच नाही तर गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रातही आज संध्याकाळी भूकंपाचे झटक जाणवले आहेत. आयएसआरच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, तिथल्या गिर सोमनाथ जिल्हा प्रशासनाकडे भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जैविक किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही. आयएसआरच्या अंदाजानुसार, संध्याकाळी 6.08 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

 

गुजरातच्या भूकंपाचे केंद्र गिर सोमनाथ जिल्हायातील तलाला परिसराजवळ 2 किमी अंतरावर होतं. विशेष म्हणजे जपान देश देखील भूकंपाने हादरला आहे. जपानच्या इशिकावा प्रांतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती, अशी माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -