Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रटाटाचा शेअर 70 टक्के स्वस्त, खरेदीसाठी गुंतवणुकदारांच्या उड्या

टाटाचा शेअर 70 टक्के स्वस्त, खरेदीसाठी गुंतवणुकदारांच्या उड्या

टाटा ग्रुपचा टीटीएमएल म्हणजेच टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड च्या शेअरमध्ये मंगळवारी (26 नोव्हेंबर) प्रचंड तेजी दिसून आली. टाटा ग्रुपच्या या शेअरमध्ये 13 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होऊन शेअर 78.11 रुपयांवर पोहोचला.

 

टीटीएमएलचा शेअर मंगळवारी 69.86 रुपयांवर उघडला आणि 78.11 रुपयांवर पोहोचला. यापूर्वी शेअर बाजार बंद झाला तेव्हा शेअरची किंमत 69.86 रुपये इतकी होती. ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप जास्त होते आणि सुमारे 41,135,747 शेअर्समध्ये ट्रेडिंग झाली आणि जवळपास 319 कोटींचा व्यवहार झाला. टीटीएमएलच्या स्टॉकची 52 वीक लो (52 आठवड्यांची नीचांकी किंमत) 65.29 रुपये होता आणि उच्चांकी किंमत 111.40 रुपये होता.

 

टाटा ग्रुपच्या या शेअरमध्ये अचानक इतकी तेजी होण्यामागे सरकारची एक घोषणा आहे. मोदी सरकारने टेलिकॉम कंपनीच्या बँक गॅरंटी इश्यूला तत्वत: मान्यता दिल्यानंतर टाटा ग्रुपची टेलिकॉम कंपनी टीटीएमएलच्या शेअर्समध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईवर मोठी वाढ दिसून आली. मंत्रिमंडळाने 2022 पर्यंत स्पेक्ट्रम खरेदीसाठी थकित बँक गॅरंटी माफ करुन टेलिकॉम कंपन्यांना दिलासा दिला आहे.

 

दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रम खरेदीसाठी ऑपरेटर्सची बँक गॅरंटी माफ करण्याला समर्थन दिले होते. यासोबच टीटीएमएलच्या शेअर्सच्या किमतीत वाढ होण्यास कारणीभूत असलेल्या प्राथमिक घटकांपैकी एक म्हणजे टेलिकॉम क्षेत्रातील एकूण सकारात्मक भावना आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल गुंतवणुकदार अधिकाधिक आशावादी होत आहेत. विशेषत: डिजिटल सेवांची मागणी सातत्याने वाढत आहे.

 

 

टीटीएमएलच्या शेअर्सची स्थिती

 

टाटा ग्रुपच्या या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. गेल्या पाच दिवसांत 14 टक्के आणि एका महिन्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत शेअरमध्ये 17 टक्क्यांची घसरण झाली आहे. एका वर्षात 12 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या दोन वर्षांत मोठी घसरण झाली आहे. टीटीएमएलच्या शेअर्समध्ये 11 जानेवारी 2022 पासून 72 टक्क्यांनी मोठी घसरण झाली आहे. 11 जानेवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 291.05 रुपये होती. गेल्या पाच वर्षांत शेअरमध्ये 2600 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आता बुधवारी (27 नोव्हेंबर) टीटीएमएल शेअरच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून येत आहे आणि स्टॉक 84 रुपयांवर ट्रेंड करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -