देशात इलेक्ट्रिक वाहन बाजार जोमात आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात धडाधड नवनवीन मॉडल उतरवत आहेत. त्यात महिंद्रा कंपनी पण मागे नाही. कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक एसयुव्हीची बाजारात दिमाखात प्रवेश केला. महिंद्रा XEV 9e आणि BE 6e अशा दोन खास कार बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. कसं आहे त्यांचं डिझाईन, काय आहे या कारचे फीचर, काय आहे या दोन कारची किंमत?
महिंद्रानं बाजारात दोन इलेक्ट्रिक एसयुव्ही बाजारात उतरवल्या आहेत. Mahindra XEV 9e, Mahindra BE 6e या दोन इलेक्ट्रिक SUV बाजारात आणल्या. या कार अगदी आलिशान असल्याचा दावा करण्यात येत आहे. कशा आहेत या दोन कार?
Mahindra XEV 9e : महिंद्राच्या या कारचे समोरील बाजू दमदार आहे. तिला बोनेटखाली LED DRL सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने त्यात एलईडी फॉग लॅम्प आणि एअर इनलेटचा समावेश केला आहे. त्याला LED टेल लाईट सेटअप दिला आहे. यामध्ये वरील बाजूला स्लीक, एल आकाराचे LED DRL दिले आहे. LED टेल लाइट्समुळे महिंद्रा XEV 9e चा दमदार लूक दिसतो.
XEV 9e कारमध्ये 59kWh आणि 79kWh LFP लिथियम-लोह-फॉस्फेट बॅटरीचा वापर केला आहे.ही कार 20 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. त्यासाठी 175 kW DC फास्ट चार्जरचा वापर होतो. ही कार 6.7 सेकंदात 0-100kph वेगाने धावण्याचा दावा करण्यात येत आहे. 79 kWh युनिटला कार पूर्ण चार्ज झाल्यास 656 किमी पर्यंतची रेंजचा दावा करण्यात आला आहे. तर 59 kWh युनिट 231 hp पॉवर जनरेट करते. या कारची एक्स शोरूम किंमत 21.90 लाख रुपये इतकी आहे. पण त्यात इतर खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही.
Mahindra BE 6e : महिंद्राची ही कार दोन बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. या कारची एक बॅटरी 59 kWh युनिट आणि दुसरी 79 kWh युनिटची आहे. ही कार 6.7 सेकंदात 0-100 mph इतका वेग पकडते. या कारची बॅटरी चार्ज झाल्यावर 682 किमीचा पल्ला गाठते. ही बॅटरी अवघ्या 20 मिनिटांत 20 टक्क्यांवरून 80 टक्के चार्ज होते. त्यासाठी 175 kW DC फास्ट चार्जरचा वापर होतो. महिंद्रा BE 6e ची सुरूवातीची किंमत 18.90 लाख रुपयांच्या घरात आहे.