महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली.
या साऱ्या घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसंच, लवकरच महायुतीची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघू शकेल. तोवर राज्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणुकीच्या पूर्वीही…”
आम्ही सर्व एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीत मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वीही सांगितलं होतं. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. सर्वांच्या मनातील किंतू परंतू एकनाथ शिंदे यांनी दूर केले – देवेंद्र फडणवीस