कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव येथील यंत्रमाग कारखानदाराला सव्वा कोटींना (cheated)गंडा घातल्या प्रकरणी गोव्याच्या निवृत महिला अधिकाऱ्याची अटक आता अटळ बनली आहे. दरम्यान, नाशिकच्या एका बड्या उद्योजकाचे नाव आता पुढे आले असून सदर महिला अधिकारी व या उद्योजकांनी या गुन्हयाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी यड्राव येथील संतोष पाटील यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी भा.द.वि 406, 420, 465, 467,471 व 506 – अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणातील वैशाली राया मांजरेकर फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत.
संतोष पाटील यांचेकडे अतुल मोदी नावाचा विक्री प्रतिनिधी आहे, गोव्यातील केंद्रिय भांडार हे शासकीय कार्यालय पंचायतीसाठी स्टेशनरी खरेदी करणार असल्याचे अतुल मोदी यांनी संतोष पाटील यांना सांगितले. त्यानुसार पाटील यांनी वैशाली मांजरेकर यांना संपर्क केला. वैशालीने संतोष पाटील यांची मक्तेदार म्हणून नोंदणी करून घेऊन स्टेशनरी साहित्य पुरवण्याबाबातचा आदेश दिला.त्यानंतर वैशाली हिने नाशिक मधील वृषभदेव (cheated)व्हेंचर्स यांचेकडून स्टेशनरी साहीत्य खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्या प्रमाणे नाशिकच्या वृषभदेव व्हेंचर्सचे मालक धवल शहा यांनी ३ कोटी ७६ लाख ६३ हजार ३२ रुपये रकमेचे बिल तकारदार संतोष पाटील यांना दिले. व सर्व स्टेशनरी साहित्य आयशर ट्रकने गोव्यातील भांडारला पाठवल्याचे सांगितले.
तक्ररदार पाटील यांनी वैशाली मांजरेकर यांचेकडे जीएसटी बिलाची मागणी केली, त्याप्रमाणे वैशालीने जीएसटीचे बील देऊन दोन महिन्यात संबधित भकीत बील काढण्याची हमी दिली. त्यानंतर ३ काटी ७६ लाखांपैकी १ कोटी २० लाख रुपये तक्रारदार पाटिल यांनी धवल शहा यांना दिले. पण गोव्यातील भांडाराकडून उर्वरित बील न मिळाल्याने तक्रारदाराने गोव्यात शहानिशा केली असता वैशाली मांजरेकर हिची मुंबईला(cheated) बदली झाली असून तिला निलंबित केल्याचे सांगण्यात आले.
वैशालीने बोगस जीएसटी बील तयार करून दिल्याचा भांडाफोडही झाला. १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याने पाटील यांनी फिर्याद दिली. .त्यानंतर वैशाली हिने नाशिक मधील वृषभदेव व्हेंचर्स यांचेकडून स्टेशनरी साहीत्य खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्या प्रमाणे नाशिकच्या वृषभदेव व्हेंचर्सचे मालक धवल शहा यांनी ३ कोटी ७६ लाख ६३ हजार ३२ रुपये रकमेचे बिल तकारदार संतोष पाटील यांना दिले. व सर्व स्टेशनरी साहित्य आयशर ट्रकने गोव्यातील भांडारला पाठवल्याचे सांगितले.