Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडा8 टीम आणि 1 ड्रीम,  आजपासून आशिया कपला सुरुवात, टीम इंडियाचा पहिला...

8 टीम आणि 1 ड्रीम,  आजपासून आशिया कपला सुरुवात, टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना हा 8 डिसेंबरला होणार आहे. हे सामने दुबई आणि शारजाह येथे आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 2 गटात 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे.ए ग्रुपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी आणि शेजारी टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोघांना समावेश आहे. तसेच जपान आणि यजमान यूएई हे 2 संघ आहेत. तर दुसऱ्या बाजूला बी ग्रुपमध्ये नेपाळ,श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना होईल आणि विजेता संघ कोण? हे निश्चित होईल. बांगलादेश गतविजेता संघ आहे.

 

किती वाजता सुरुवात होणार?

या स्पर्धेतील सर्व 15 सामन्यांना एकाच वेळेस अर्थात सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. हे सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तसेच लाईव्ह सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येतील.

 

टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा?

टीम इंडियाचा पहिला सामना हा 30 नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ एकमेकांविरूद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करणार आहेत.

 

अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक

 

आशिया कपसाठी 8 संघ

टीम इंडिया : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, किरण चोरमले (वीसी), प्रणव पंत, हरवंश सिंह पंगालिया (विकेटकीपर), अनुराग कावडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद एनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजीत गुहा, चेतन शर्मा आणि निखिल कुमार.

 

अफगानिस्तान: मेहबूब तस्कीन (कॅप्टन आणि विकेटकीपर), हमजा अलीखिल (विकेटकीपर), उजैर खान, फैसल खान, बरकतुल्ला इब्राहिमजई, एजातुल्लाह बारिकजई, अजीज मियाखिल, नजीफ अमीरी, अब्दुल अजीज, नसरतुल्लाह नूरिस्तानी, खातिर स्टानिकजई, फहीम खेववाल, हफीज जादरान, अल्लाह मोहम्मद गजनफर आणि नसीर खान मारूफखिल

 

जपान: कोजी हार्डग्रेव-अबे (कॅप्टन), चार्ल्स हिंज, काज़ुमा काटो-स्टैफोर्ड, ह्यूगो केली, टिमोथी मूर, स्काइलर नाकायमा-कुक, डैनियल पैनकहर्स्ट, निहार परमार, आदित्य फडके, आरव तिवारी, काई वॉल, युतो यागेटा, किफर यामामोटो-लेक आणि मॅक्स योनेकावा-लिन.

 

नेपाळ: हेमंत धामी (कर्णधार), अर्जुन कुमाल (उपकर्णधार), दिलशाद अली, नरेन भट्टा, रोशन बिस्वाकर्मा, युबराज खत्री, रंजीत कुमार, उत्तम मगर (विकेटकीपर), बिपिन महतो, दयानंद मंडल, अपराजित पौडेल, नरेन सऊद, उनीश ठाकुरी, अभिषेक तिवारी, आकाश त्रिपाठी, मयन यादव, राजेश यादव आणि संतोष यादव.

 

पाकिस्तान: साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद अहमद, हारून अरशद, तैयब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नवीद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रजा, मोहम्मद रियाजुल्लाह, अब्दुल सुभान, फरहान यूसुफ आणि उमर जैब.

 

बांगलादेश: अजीजुल हकीम तमीम (कॅप्टन), जवाद अबरार (उपकर्णधार) अल फहद, अशरफुज्जमां बारेनावा, देबाशीष सरकार देबा, फरीद हसन फैसल, इबल हसन एमोन, मारुफ मैधा, रफी उज्जमान रफी, रिफत बेग, रिजान होसन, साद इस्लाम रजिन, समियुन बसीर रतुल आणि शिहाब जेम्स.

 

श्रीलंका: विहास थेवमिका (कॅप्टन), पुलिंदु परेरा, थानुजा राजपक्षे, डुलनिथ सिगेरा, लॅकविन अबेसिंघे, विमथ दिनसारा, रामिरू परेरा, कविजा गमागे, वीरन चामुदिथा, प्रवीण मनीषा, येनुला देउथुसा, शारुजन शनमुगनाथन, न्यूटन रंजीतकुमार, कुगदास मथुलन आणि गीतिका डे सिल्वा.

 

यूएई: अयान खान (कॅप्टन), अक्षत राय, आर्यन सक्सेना, अब्दुल्ला तारिक, अलियासगर शम्स, एथन डिसूजा, फसीउर रहमान, हर्ष देसाई, करण धीमान, मुदित अग्रवाल, नूरुल्लाह अयौबी, रचित घोष, रेयान खान, उदीश सूरी आणि यायिन किरण.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -