बिरदेव बॅंकेवर हल्ला करत एका इसमाने बँकेच्या काचा फोडल्या तसेच इतरही नुकसान केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी घडली. याबाबत नोंद घेण्याचे काम पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
त्यातील काचा फोडणारा इसम उत्तम बंडगर राहणार शहापूर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
ही घटना सोमवारी घडली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील सर्व स्टाफ तसेच बँकेच्या शेजारीपाजारी असणारे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने जमले. यानंतर या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. आणि इतर नोंदी करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. दरम्यान ही घटना कशासाठी घडली याबाबत सविस्तर माहिती समजली नाही.