बॉर्डर गावकसर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची ताकद दुप्पट होणार आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात कमबॅक करु शकतो. एडलेडमध्ये टीम इंडियाला 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांशी संवाद साधला. रोहितने या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. रोहितने या दरम्यान मोहम्मद शमीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. शमी या मालिकेत खेळण्याची आशा आहे. त्याच्यासाठी भारतीय संघाचं दार खुलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमी शेवटचे 2 कसोटी सामने खेळू शकतो, असं म्हटलं जात आहे. शमीला आता फक्त एनसीएकडून एनओसी अर्थात फिटनेस सर्टिफिकेटची प्रतिक्षा आहे.
एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर त्याला बंगळुरुतील एनसीएत पाठवलं जातं. एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकेडमी. येथे वैद्यकीय पथकाच्या निगराणीत खेळाडूंना दुखापतीतून पूर्णपणे फिट करण्यासाठी शक्यत तितते प्रयत्न केले जातात. उपचारांनंतर खेळाडूला फिटनेस टेस्ट द्यावी लागते. खेळाडू त्या टेस्टमध्ये पास झाल्यास एनसीएकडून संबंधित खेळाडूला फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं.
मीडिया रिपोट्सनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्याला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शमी त्याआधी ब्रिस्बेनमध्ये पोहचणार आहे. मात्र त्या सामन्यात संधी मिळणं अवघड आहे. रोहितला शमीबाबत विचारण्यात आल्यानंतर त्याने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात.
रोहित शर्मा काय म्हणााल?
“निश्चित. शमीसाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत. आम्ही शमीकडे लक्ष ठेवून आहोत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शमीच्या गुडघ्याला सूज आली होती. ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं”, असं रोहित म्हणाला.
“आम्हाला निश्चित करायचं आहे. आम्हाला शमीवर दबाव टाकायचा नाहीय. शमीवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथखक लक्ष ठेवून आहे. शमी जे करतोय त्याकडे आमचं लक्ष आहे”, असंही रोहितने म्हटलं,
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.