मीठाशिवाय कोणत्याही खाद्यपदार्थाला चव येऊ शकत नाही. तुम्ही जर एखाद्या पदार्थामध्ये मीठ टाकलंच नाही तर त्या पदार्थाची कोणतीही चव तुम्हाला लागणार नाही. तु्म्ही स्वयंपाक बनवताना भाजीमध्ये कितीही मसाले वापरा, मात्र जोपर्यंत तुम्ही त्यात मीठ टाकत नाही, तोपर्यंत त्या भाजीची चव तुम्हाला लागणार नाही, किंवा ती भाजी देखील तुम्हाला खावी वाटणार नाही.मीठ हे एक प्रकराचं खनिज आहे, जे सोडियम क्लोराइडपासून बनतं. तुम्हाला रोज घरात ज्या वस्तू आवश्यक असतात, त्यामध्ये मीठ ही सर्वात आवश्यक आणि गरजेची वस्तू आहे.
तुमच्या घरात असलेल्या विविध प्रकारच्या भाज्या, दाळ आणि इतर वस्तू एका विशिष्ट कालावधीनंतर खराब होतात. म्हणजे त्यांना एक्सपायरी डेट असते. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मीठाला देखील एक्सपायरी डेट असू शकते? कोणत्याही भाजीत मीठ टाकताना खूप काळजी घ्यावी लागते. मीठ जास्त टाकलं तर ती भाजी तुम्हाला खाता येत नाही, खारट बनते. मात्र असं अनेकदा होतं की तुम्ही जर एखाद्या भाजीमध्ये कितीही मीठ टाकलं तरीही तुम्हाला चव लागत नाही. याचा अर्थ असा होतो का की त्या मिठाची मुदत संपली आहे? मीठ एक्सपायर झालं आहे. जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर.
मीठ एक्सपायर होतं का?
साधारणपणे मीठ हे सोडियम क्लोराइडपासून बनलेलं असतं. जे रासायनिकदृष्या स्थिर असते. याचाच अर्थ मिठावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही. म्हणजेच मीठ कधीही एक्सपायर होत नाही. मीठामध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी देखील वाढू शकत नाही. कारण एखाद्या पदार्थाला खराब करणारे जे बॅक्टेरिया असतात त्यांना वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र जे शुद्ध मीठ असतं त्यामध्ये पानी नसंत त्यामुळे मीठ कधीही एक्सपायर होतं नाही.
मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जे मीठ समुद्रातून मिळतं ते खराब होत नाही. मात्र तुम्ही जे घरात मीठ वापरतात त्याला फिल्टर केलेलं असतं. त्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागतं. त्यामध्ये आयोडिन देखील टाकलं जांत त्यामुळे असं मीठ खराब होण्याची शक्यता असते, त्याला एक्सपायरी डेट असते. त्यामुळे एक्सपायरी डेट चेक करूनच मिठाचा वापर करावा.