Wednesday, December 11, 2024
Homeक्रीडादुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे हे निर्णय ठरले पराभवाचं कारण, जाणून...

दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे हे निर्णय ठरले पराभवाचं कारण, जाणून घ्या

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं आहे. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट राखून पराभव केला. तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. कर्णधार रोहित शर्माचं नेमकं काय चुकलं ते जाणून घ्या

 

कर्णधार रोहित शर्माचा पहिला निर्णय चुकला नाणेफेकीवेळीच.. कारण कौल बाजूने लागूनही त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण सामन्यापूर्वी ढगाळ वातावरण होतं. त्याचा फायदा स्टार्कने घेतला. भारतीय खेळाडूंना मोकळेपणाने खेळता आलं नाही.

 

नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनमध्येही रोहित शर्माने मोठी चूक केली. या कसोटीत हर्षित राणाऐवजी आकाश दीपची निवड करावी असं आधीच क्रीडातज्ज्ञ म्हणत होते. कारण पिंक बॉलमध्ये हार्षितपेक्षा आकाश दीप अधिक प्रभावी ठरला असता.

 

वरिष्ठ फलंदाज गेल्या काही सामन्यांपासून सतत फेल होत आहे. तरी त्यांना वारंवार संधी दिली जात आहे. त्यात आघाडीला आलेले केएल राहुल आणि विराट कोहली फेल गेले. मधल्या फळीत रोहित शर्मा तर काहीच करू शकला नाही. अंडर लाइट बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर गेली.

 

बुमराहने पहिल्या डावात प्रभावी गोलंदाजी केली होती, तसेच महत्त्वाच्या 4 विकेट घेतल्या होत्या. पण रोहितने त्याचा वापर ज्या पद्धतीने केला त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहने दोन बळी घेतले होते. बुमराहने या सत्रात फक्त चार षटकं टाकली.

 

हार्षित राणा सहज धावा देत असताना बुमराहला गोलंदाजी दिली नाही. इतकंच काय तर मोहम्मद सिराजला लय खूप उशिराने सापडली. त्याची किंमत टीम इंडियाला मोजावी लागली. गोलंदाजांनी हेडविरुद्ध शॉर्ट बॉलचा वापर केला नाही. इतकंच काय तर पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी स्टंपवर 6 टक्के गोलंदाजी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -