इचलकरंजी : चक्कर येऊन पडल्याने कॉलेज युवकाचा मृत्यू
मित्रांसोबत नाश्ता करून परत येत असताना रस्त्यावर चक्कर येऊन पडल्याने कॉलेज युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला भागेश कृष्णा धुमाळे वय 17 राहणार यड्राव तालुका शिरोळ असे त्याचे नाव आहे सदरची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथील मोठे तळ परिसरात घडले आहे याबाबतची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी भाग्येश धुमाळे हा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावी मध्ये शिकत होता मंगळवारी सकाळी मोठे तळे परिसरात तो मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी गेला होता. कॉलेजकडे परत जाताना त्याला चक्कर आली मात्र पुन्हा उठून तो चालू लागतात पुन्हा चक्कर आली त्याला त्याच्या मित्रांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर आईजीएम रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.